मराठी नाटकांचे ऑनलाइन प्रमोशन
मराठी नाटकाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, मराठी नाटकं आणि चित्रपट नवीन कोणती आहेत माहित नाहि पडत, येत्या रविवारि गडकरिला कोणत नाटक आहे ? अशा अनेक ई-मेल्सला काय उत्तर द्यायचे तेच कळत नव्हते. या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधन्यासाठी आम्ही गेल्या काही महिन्यापुर्वी एक ई-मेल सर्वे केला होता. त्या सर्वेचा मराठीथिएटर.कॅामच्या टिमने अभ्यास केला आणि काही योजना आखण्याचा निर्णय मराठीथिएटर.कॅामने घेतला.
मराठी नाटकांची जाहिरात होते ती फक्त वृत्तपत्रांद्वारे. टि.व्हि. आणि रेडिओवर फारच कमी. काही नाटकांनी वेबसाईटद्वारे प्रमोशन केले आहे, पण वेबसाईटची जाहिरात होते ती सुद्धा वृत्तपत्रात. त्यात वेबसाईट बनवणे सगळ्याच निर्मात्यांना परवडेलच अस नाही. तर अशा काही गोष्टि लक्षात घेउन मराठीथिएटर.कॅाम मराठी नाटकांच ऑनलाइन प्रमोशन ही आनलाईन सेवा तयार केली आहे.
on डिसेंबर 8, 2009 on 9:15 pm
नमस्कार ,
ह्या site बद्दल जानून फ़ार छान वाटले .माहीती करता धन्यवाद.