Marathi Theatre.com


“अस्तित्व”- “नाटयसंहिता कार्यशाळा”

Posted in Latest News by marathitheatre on जून 9, 2009

सध्या नाटयक्षेत्रात प्रयोगक्षम नाटयसंहितांची मोठी गरज आहे, मात्र त्या तुलनेत दर्जेदार  लेखन करणा-या लेखकांची उणीव जाणवते. काही वेळा लेखन चांगले असले तरी ते प्रयोगात रूपांतरित करताना  ती संहिता समजुन घेण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शक आणि अभिनेते कमी पडत असल्याने एक वेगळीच कोंडी निर्माण झाली आहे.

नाटयसंहितेच्या निर्मितीची प्रक्रिया,तिचा कल्पनाविस्तार , त्यातली स्थित्यंतर,नाटकाचा उत्कर्ष बिन्दू हे नाटयलेखनाच्या व्याकरणातले मुलभूत सिद्धांत उदयोन्मुख लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना  जोपर्यंत परिचयाचे होत नाहीत तोपर्यंत ही कोंडी फुटणे कठिण आहे,हे लक्षात घेऊन “अस्तित्व” या संस्थेने त्यांच्या बहुचर्चित “नाट्यलेखन कार्यशाळेच्या” उपक्रमात किंचित बदल करून  “नाटयसंहिता कार्यशाळा” आयोजित केली आहे. जेणेकरून  नवलेखकांबरोबरच दिग्दर्शक आणि कलाकारांचा ही त्यात समावेश होऊ शकेल.

नाटयसंहिता शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडण्याच्या या उपक्रमातून नाटय अभ्यासाची वृत्ती विकसित  करण्याकडे भर देण्यात येणार आहे.

या आधीच्या  कार्यशाळांप्रमाणेच दर दोन महिन्यांच्या अंतराने बारा सत्रांमध्ये वर्षभर ही कार्यशाळा चालेल.

यंदाची पहिली कार्यशाळा येत्या तेरा आणि चौदा जूनला प्रभादेवीच्या पु.ल.देशपांडे कला अकादमीत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत पार पडेल.यात ज्येष्ठ नाटयलेखक अशोक पाटोळे, अभिराम भडकमकर आणि डॉ. अनिल बांदिवडेकर मार्गदर्शन करतील  

 

“अस्तित्व” चा हा उपक्रम निःशुल्क आहे. या कार्यशाळेसाठी नावनोंदणी आणि अधिक   माहितीसाठी संपर्क : रवी मिश्रा  ९८२१०४४८६२ – astitvateam@gmail.com .

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s


%d bloggers like this: