Marathi Theatre.com


अस्तित्व – आय.एन . टी आयोजित खुल्या हिंदी एकांकिका स्पर्धेत वेगळ्या विषयांमुळे चुरस


अस्तित्व आणि इंडियन नॅशनल थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या हिंदी एकांकिका  स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा सर्वस्वी वेगळ्या विषयांवरील एकांकिकांच्या चोख सादरीकरणामुळे चुरस निर्माण झाली,त्यामुळे अंतिम फेरीसाठी पाच ऐवजी सहा एकांकिकांची निवड परीक्षकांनी केली. या सहा हिंदी एकांकिकांची अंतिम फेरी येत्या शनिवारी बारा सप्टेंबरला गिरगावच्या साहित्य संघ मंदिर येथे दुपारी तीन वाजल्यापासून संपन्न होईल.भावनाप्रधान एकांकिकांबरोबरच भयकथेचा माहौल उभी करणारी एकांकिका तसेच गेल्या काही वर्षात युवा एकांकिका स्पर्धेचे वैशिष्ट्य असायला हवी पण प्रत्यक्षात स्पर्धेतून जवळपास हद्दपार झालेली प्रेमकथा सादर होणे तसेच द्विपात्री ते समूह नाट्याचा समतोल साधला जाणे ही यंदाच्या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्य आहेत. यंदा या स्पर्धेच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या प्राथमिक फेरीत चौदा एकांकिका सहभागी झाल्या.त्यापेकी मिठीबाई महाविद्यालयाची “लुकाछुपी”, यवनिका थिएटर्सची “सच”, ठाकूर महाविद्यालयाची “भावनांटिका” अष्टविनायक थिएटर्सची “ब्रेन”, पाटकर महाविद्यालयची “स्टॅण्ड बाय …. मी”, पी.डी.लायन्स महाविद्यालयाची “काऊण्ट डाऊन” या एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या. प्राथमिक फेरीचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी दर्पण मिश्रा, लक्ष्मीकांत कर्पे, तुलसी बेहरे तसेच आमोद भट यांनी केले.

Read More

तुमचा अभिप्राय नोंदवा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s


%d bloggers like this: