Marathi Theatre.com


“झेंडा” – अभिव्यक्ती स्वातंत्र्य की अतिस्वातंत्र्य

Posted in Articles by marathitheatre on जानेवारी 13, 2010
Tags: , , ,

आज प्रदर्शित होणारा “झेंडा” हा अवधूत गुप्ते दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट काही आक्षेपांमुळे पुढे ढकलला गेला आणि राजकीय सेन्सॉरशिपचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.काल दुपारपासून प्रसिद्धीमाध्यमांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगान॓ चर्चा घडवून आणल्या तर अनेकांनी गळे काढले.ज्यांनी हा चित्रपट दुरान्वये ही  पाहिलेला नाही ती मंडळी तावातावाने या चित्रपटाबद्दल बोलती झाली.
शिवसेनेपासून फुटलेली कार्यकर्त्यांची एक शाखा म्हणजे मनसे आणि त्यांचे नेते राज ठाकरे हा परिचय  कोणालाही  नव्यानं करून देण्याची गरज  नाही.मनसेची ताकद ती कसली म्हणणाऱ्या भल्याभल्यांना  या पक्षां लोकसभेपाठोपाठ  विधानसभेतही दे धक्का दिला आणि हा नवा पक्ष सर्वात जास्त त्रासदायक ठरतोय तो शिवसेनेलाच.

Read more

Advertisements